शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम २००५. हा कायदा दिनांक १५ जून २००५ रोजी संमत झाला.
दि. १२ ऑक्टोबर २००५ रोजी महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २००५ अस्तित्वात येऊन हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला.

हा कायदा लागू झाल्यामुळे महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २००२ रद्द करण्यात आला आहे. एकाच उद्देशपूर्तीसाठी केंद्राचा व राज्याचा असे दोन स्वतंत्र कायदे असल्यास नागरिकांच्या गोंधळात भर पडेल याची जाणीव ठेवून पूर्वीचा कायदा रद्द करण्याचा स्तुत्य निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००२ च्या खाली यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या अर्ज व अपिलांवरील निर्णय त्याच अधिनियमानुसार होणार आहे. या अर्ज व अपिलांसाठी नवा कायदा लागू होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा